घरताज्या घडामोडीलक्ष्मीला नाही म्हणू नका, भाजपचा पैसा घेऊन महाविकास आघाडीला मत द्या, मिटकरींचा...

लक्ष्मीला नाही म्हणू नका, भाजपचा पैसा घेऊन महाविकास आघाडीला मत द्या, मिटकरींचा सल्ला

Subscribe

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांचे सभा, मेळाव्यांचा कार्यक्रम जोरात सुरु आहेत. राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी शेवटच्या दिवशी भर सभेत मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. दिवाळी येते आहे. लक्ष्मीला नाही म्हणू नका, भाजपने पैसै दिले तर घ्या आणि महाविकास आघा़डीलाच मतदान करा असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. काही दिवसांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही कार्यकर्त्यांना खुली ऑफर दिली होती त्याची देखील चर्चा रंगली होती.

नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रचार सभा घेत आहेत. बुधवारी घेतलेल्या शेवटच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी दिलेला सल्ला वादग्रस्त ठरला आहे.

- Advertisement -

राषट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देगलूर बिलोली मतदारसंघातील मतदारांना प्रचारसभेत सल्ला दिला आहे. मिटकरी म्हणाले की, पंढरपूरमध्ये जी चूक मतदारांकडून घडली. ती चूक इथे घडू देऊ नका, तुमचे मत मिठ मिर्ची एवढं स्वस्त समजून या दलालांपुढे ठेऊ नका त्यांच्याकडे पैसे खूप आहेत. त्यांचे एक एक कार्यालय ३० हजार कोटीचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा.. लक्ष्मीला नाही म्हणू नका.. फटाके घ्या, चिवडा, चकल्या, बायकोला साडी, लग्नाला नवीन कपडे, शेजारालाही दोन ड्रेस, पैसा घ्यायचा भाजपचा आणि मत द्यायचे महाविकास आघाडीला असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांची खुली ऑफर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खुली ऑफर दिली आहे. या ऑफरची देखीच चांगलीच चर्चा रंगली होती. प्रचार करताना कार्यकर्त्यांना पाटील यांनी ऑफर दिली होती. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्याकडून गावजेवण देईल. या गावजेवणमध्ये मी स्वतः सहभागी होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती.

- Advertisement -

नांदेडमध्ये ३० ऑक्टोबरला मतदान

नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे आमदार दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे या ठिकाणी जागा रिक्त झाली होती. या जागेवर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.


हेही वाचा :  देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास गाव जेवण देईल, चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -