किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील जनता नाराज, अमोल मिटकरींचा टोला

Amol Mitkari

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) राज्यात महाविकास आघाडीसह भाजपाने (BJP) देखील जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत सोमय्यांना टोला लगावला आहे.

तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील नेते आणि सुप्रसिद्ध उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाविकास आघाडीविरोधात आंदोलनं आणि दौरे करुन भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सातत्याने आवाज उठवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का?, या चर्चेला पूर्णविराम मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा : Rajya Sabha Election : राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होणार, BJPचे धनंजय महाडिक अर्ज भरणार?