घरताज्या घडामोडीखातेवाटपावरील नाराजीमुळे शिंदे गटातील आमदार मातोश्रीत जाऊन बसतील, अमोल मिटकरींची टीका

खातेवाटपावरील नाराजीमुळे शिंदे गटातील आमदार मातोश्रीत जाऊन बसतील, अमोल मिटकरींची टीका

Subscribe

शिंदे गटातील खातेवाटपानंतर आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खातेवाटपावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे गटातील काही आमदार खातेवाटपावरील नाराजीमुळे पुन्हा एकदा मातोश्रीत जाऊन बसतील, अशी खोचक टीका अमोल मिटकरींनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह आणि अर्थ खातं मागितलं होतं असा दावाही अमोल मिटकरींनी केला आहे. शिंदेंनी नगरविकास खाते कायम ठेवले असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे कायम ठेवण्यात आली आहेत.

- Advertisement -

गृह, अर्थ, महसूल, सहकार, उर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडे राहणार आहेत. भाजपामध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकटवर्तीयांच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत.

ज्या अपेक्षेने शिंदे गट फडणवीसांसोबत किंवा भाजपासोबत गटबंधनामध्ये आणि सत्तेमध्ये आला त्या अपेक्षेचा या खातेवाटपामुळे भ्रमनिरास झालेला आहे, अशी प्रतिक्रिया मंत्रीमंडळ विस्तारानंतर अमोल मिटकरींनी दिली आहे. शिंदेंकडून गृह आणि अर्थ खात्याची मागणी करण्यात आली होती पण ती फडणवीसांनी आपल्याकडे ठेऊन घेतली. फडणवीसांनी महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवली, असा दावाही मिटकरींनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : उंदराला सापडली चिंधी.., खातेवाटपानंतर गुलाबराव पाटलांचा शिवसेनेला टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -