घरमहाराष्ट्रभारत जोडो यात्रेत सहभाग घेत अमोल मिटकरींची भाजपावर सडकून टीका; म्हणाले...

भारत जोडो यात्रेत सहभाग घेत अमोल मिटकरींची भाजपावर सडकून टीका; म्हणाले…

Subscribe

ये किसने कहा आपसे मैं आँधी के साथ हुं? मैं गोडसे के दौर मे "गांधी" के साथ हुं ll असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात जे वक्तव्य केले त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. शिंदे गट, भाजप आणि मनसे यांनी सुद्धा निषेध केला. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत (bharat jodo yatra)  सहभाग घेत भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राहुल गांधी (rahul gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या विधानानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलीच आक्रमक झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले होते त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी थेट राहुल गांधींच्या शेगाव मधील सभेत जाऊन निषेधाचे झेंडे फडकवले. तर भाजप (bjp) नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. त्याचसोबत आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले त्यावरून भाजपने आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. यातच अमोल मिटकरी हे आता भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं

याच संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. ये किसने कहा आपसे मैं आँधी के साथ हुं? मैं गोडसे के दौर मे “गांधी” के साथ हुं ll असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. सोबत भारत जोडो यात्रेचा हॅशटॅगही मिटकरी यांनी वापरला आहे. यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये, राहुल गांधींच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा ,”छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ यांनी घडविले”! मात्र महाराष्ट्रात सद्य स्थिती धर्मांध विचारसरणी हे मान्य करायला तयार नाही. खोटा इतिहास पसरविणाऱ्यांची पिलावळ मोठ्या प्रमाणात वाढली त्या पिलावळी ला सणसणीत चपराक, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये, संतनगरी शेगाव मधील राहुल गांधी यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले .निश्चितच हे भाषण ऐकून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला. भाजपकडून अप्रत्यक्ष पाठवलेले “काळे झेंडे” सुद्धा या भाषणामुळे इतिहास जमा झाले, असा टोला अमोल मिटकरींनी लगावला.

- Advertisement -

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधींना हे विधान करण्याची आज नव्हती असे संजय राहुल म्हणाले. तर याच संदर्भात मनसेने जे आंदोलन केले त्यासाठी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी रणजित सावरकर यांनी शिवर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.


हे ही वाचा – अजित पवारांनंतर रोहित पवारही अडचणीत? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची शक्यता

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -