Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र कदाचित ते '40 गरीब गोविंदां'ना ठाण्यातून आणलेल्या मलाईबाबत बोलले असावेत, आमदार अमोल मिटकरींची टीका

कदाचित ते ’40 गरीब गोविंदां’ना ठाण्यातून आणलेल्या मलाईबाबत बोलले असावेत, आमदार अमोल मिटकरींची टीका

Subscribe

भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दही हंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी दहीहंडीतील मलई गोरगरीबांपर्यंत पोहचवू, असे म्हणत त्यांनी राजकीय टोलो बाजी केली. याव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.

ट्विटमध्ये काय –

- Advertisement -

या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस जी दहीहंडी कार्यक्रमात बोलले _”आम्ही मलाई गोरगरीबां पर्यंत पोहचवु” — कदाचित ते सुरत व गुवाहाटी मधे बसुन गलेलठ्ठ मलाई खाऊन टुम झालेल्या 40 गरीब गोविंदांना ठाण्यातुन आणलेल्या मलाईबाबत बोलले असावेत#मलाईदारसरकार, असे त्यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले –

आताच राम भाऊंच्या नेतृत्वात विकासाची हंडी फोडली. या हडीतील विकासीच फूल शेवटच्या मानसापर्यंत आपण घेऊन जाणार आहोत. तुम्ही गृह निर्माण प्रकल्प घेऊन या. तारखी तुम्ही ठरवायची मान्यता देण्याचे काम माजे असेल, असे ते म्हणाले. जनतेचे सरकार आले आहे. हे मुठभर लोकांचे सरकार नाही. हे गरीबांचे सामान्य मानसांचे सरकार आहे. ही हंडी फ़ुटल्यानंतर त्यातील लोणी आणि मलई प्रत्येका पर्यंत पोहोचवण्याची काम आपले सरकार निश्चीत करेल, असे ते म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -