घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे अमोल मिटकरीही शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तार म्हणाले...

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरीही शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तार म्हणाले…

Subscribe

अकोला – शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदार आमच्या संपर्कात आहेत, अशी खळबळ उडवून देणाऱ्या अमोल मिटकरींबाबतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. राष्ट्रवादीतून अनेक लोक आमच्याकडे येतात. अमोल मिटकरीसुद्धा आमच्या संपर्कात आहेत, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केलाय. अब्दुल सत्तार अकोला दौऱ्यावर आहेत, त्यावेळी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

हेही वाचा – अमोल मिटकरींनी शेअर केला बैलाचा फोटो, शिंदे गटाला म्हणाले…

- Advertisement -

आताच्या सरकारमधील अनेक लोक आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना सत्तार यांनी मिटकरीच्या आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.  अब्दुल सत्तार म्हणाले की, मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावं लागेल. डॉक्टरच सांगू शकतील, त्यांना नेमकी काय अडचण आहे.

तुम्ही जिथं जाता तिथं शेतकरी आत्महत्या करतोय

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अमोल मिटकरी प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागल्याने सत्ताधारीही त्यांच्यावर प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तारांवर जहरी टीका केली होती. तुम्ही जिथे जाताय तिथंच शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं मिटकरी म्हणाले होते. “अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीखातं आहे. विशेषत: कृषिमंत्र्यांची नाळ शेतकऱ्यांना जोडलेली असते. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, एकदा पवार साहेबांची भेट घ्या. कृषी मंत्री असताना रात्रीचे झोपण्याचे इव्हेंट करण्यापेक्षा शेतकऱ्यांना काय ठोस मदत केली, हे पाहा. सोयाबीन, धान, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही तुम्ही मदत केली नाहीये. शेतकरी हवालदिल झालाय. तुम्ही जिथे जाताहेत तिथेचं शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे या सरकारच अपयश आहे. शेतकरी दुखावलेला आहे. या दौऱ्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करून न्याय द्यावा, अन्यथा तुमच्या सिंहासनाला तडा जाईल”, अशी टीका अमोल मिटकरींनी सत्तारांवर केली होती.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांना हा खूष करण्याचा प्रयत्न, मंत्रिपदावरुन अमोल मिटकरींचा राणा दाम्पत्याला टोला

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -