घरमहाराष्ट्रआम्हाला गोळ्या घाला पण शिवरायांना आड आणू नका, मंगळसूत्र चोराचा उल्लेख करत...

आम्हाला गोळ्या घाला पण शिवरायांना आड आणू नका, मंगळसूत्र चोराचा उल्लेख करत मिटकरींचा निशाणा

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी या सर्वांवर निशाणा साधत, आम्हाला एकवेळ गोळी मारून ठार करा पण राजकीय स्वार्थासाठी महाराजांचा उल्लेख करू नका, असं म्हटलं आहे.

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला असताना आता शिंदे गटातील आमदाराने महाराजांच्या गनिमी काव्याची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा वादंग निर्माण होऊ शकतो. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी या सर्वांवर निशाणा साधत, आम्हाला एकवेळ गोळी मारून ठार करा पण राजकीय स्वार्थासाठी महाराजांचा उल्लेख करू नका, असं म्हटलं आहे. (Amol Mitkari tweet on Bhagatsingh koshyari, Sudhanshu Trivedi, Mangalprabhat lodha, Gopichand Padalkar and sanjay gaikwad)

हेही वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची दिल्लीने स्पर्धा ठेवली का? संजय राऊतांचा भाजपाला सवाल

- Advertisement -

संजय गायकवाड काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाहीत. शिवाजी महाराजांनी वेळप्रसंगी गनिमी काव्याचा वापर केला होता. त्याच गनिमी काव्याचा उपयोग एकनाथ शिंदेंनी केला. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंगलप्रभात लोढा यांनीही काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली होती. त्यामुळे राज्यात वाद सुरू आहे. त्यातच, संजय गायकवाडांनी असे वक्तव्य केल्याने भाजपा नेत्यांवर विरोधकांनी निशाणा साधला आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरी काय म्हणाले?

भगतसिंग कोश्यारी +सुधांशु त्रिवेदी +मंगळसूत्र चोर +मंगल प्रभात लोढा+ आता संजय गायकवाड…सगळं ठरवून सुरू आहे. तुम्ही कितीही घाणेरडे राजकारण करा, वेळ पडली तर आम्हाला गोळ्या घालून ठार मारा. मात्र अशा नीच राजकारणासाठी “छञपती शिवरायांना” आड आणू नका, मायबाप सरकार, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.


कोण काय म्हणालं होतं?

भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली होती. तर, सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगाजेबाला माफीचे पत्र पाठवले होते, असं म्हटलं होतं.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी ‘अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथळा काढला’ असं वक्तव्य केलं”, असा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला होता.

हेही वाचा – अरविंद सावंतांची गांधीगिरी, मंगलप्रभात लोढांना दिलं इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट

तर, आता संजय गायकवाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला असून आम्हाला ठार मारा, पण राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ये आणू नका असं म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -