एकादशी तिकडे आणि द्वादशी हिकडे, बंडखोरांसाठी अमोल मिटकरींचे खोचक ट्वीट

Amol Mitkari

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. बंडखोर आमदारांना पाठवलेली अविश्वासाची नोटीस अवैध होती. तसेच ही नोटीस कोणत्याही अधिकृत ई-मेलवरून पाठवली नव्हती. एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने ही नोटीस आली होती. त्यामुळे ती ग्राह्य धरण्यात आली नाही. दरम्यान, हा प्रस्ताव ११ जुलैपर्यंत फेटाळण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे.

अखेर पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले. याचा अर्थ महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री महापूजा करतील. तोवर बंडखोरांनी गुवाहाटीत थांबण्यास हरकत नाही. ‘एकादशी’ तिकडे आणि द्वादशी हिकडे’ असे ट्विट अमोल मिटकरी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केले आहे.

दरम्यान, शिंदेंच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणी येत्या ११ जुलै रोजी ठेवण्यात आला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला एक मोठा दिलासा दिला आहे. येत्या १२ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत शिंदे गटाला उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.


हेही वाचा : संजय राऊतांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई – सचिन अहिर