घरमहाराष्ट्र'हे' ऐकून अमोल मिटकरींचे डोळे पाणावले, ट्विटरवर मोदींचा व्हिडीओ केला शेअर

‘हे’ ऐकून अमोल मिटकरींचे डोळे पाणावले, ट्विटरवर मोदींचा व्हिडीओ केला शेअर

Subscribe

मुंबई : महागाईवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. अलीकडेच गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येते. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलून नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर करत, आपले डोळे पाणावले, असे म्हटले आहे.

देशातील पेट्रोल-डिझेल-सीएनजी, दूध, डाळी व इतर धान्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये दूधाच्या दरात तब्बल 12 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी पारच आहेत. त्यातच 1 मार्च 2023पासून सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास 50 रुपयांची तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 350 रुपयांची वाढ केली आहे.

- Advertisement -

यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडचे या महागाईबद्दल ट्वीट करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. देशातील आयात-निर्यातीचे गुणोत्तर पूर्णतः कोसळले आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या उत्पादनांमध्ये घट झाली आहे. याखेरीज चलनवाढीचा दर साडेसहापेक्षा जास्त झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संयुक्त राष्ट्रात भारताचे पाकला खडे बोल, खोट्या प्रचाराला उत्तर देणे योग्य नाही

तर, राष्ट्रवादीचेच आमदार अमोल मिटकरी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 नोव्हेंबर 2013 रोजीचा व्हिडीओ शेअर केला आहे. वाढत्या महागाईबद्दल नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना केली आहे. तसेच गॅस दरवाढीबद्दलही खोचक टिप्पणी करताना मोदी दिसतात. मिटकरी यांनी या व्हिडीओला ‘ऐकून डोळे पाणावले’ अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा – महिला दिनीच महिला आमदारांची उपेक्षा, सभागृहात अनेक सदस्य गैरहजर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -