अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर

Amol Mitkari's offer to Pankaja Munde to join NCP
अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर

ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मद्दा राज्याच्या राजकारणात तापू लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे (ankaja Munde) यांनी राज्य सरकारला सुनावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

पंकजा मुंडेंची ओबीसी आरक्षणावरून टीका –

पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना राज्य सरकारला सुनावले. ओबीसी (OBC reservation) आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण महाराष्ट्राच्या हातातून गेले. हा फार मोठा गुन्हा आहे. ओबीसी आरक्षण हा धक्का नसून धोका आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावर उत्तर देताना पंकजा मुंडेंना अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली.

हेही वाचा – मराठा समन्वयक, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप; म्हणाले, ”संभाजीराजे छत्रपतींसोबत…”

मिटकरींची पंकजा मुंडेंना ऑफर –

ज्यांच्या वडिलांनी हा पक्ष वाढवला त्या पंकजाताईंना जनआक्रोश मोर्चामध्ये साधे सन्मानाचे स्थान मिळाले नाही. मी तर पंकजाताईंना विनंती करतो, की जिथे आपला अपमान होत असेल, अशा लोकांना लाथ मारावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दारे आपल्यासाठी उघडी आहेत. तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता आहे, अशी ऑफर आमदार अपोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीला दिली आहे.

हेही वाचा –  खासदार संजय राऊतांचा २८ मे रोजी कोल्हापूर दौरा, जाहीर सभा घेणार

मनसेवर टीका –

दरम्यान, अमोल मिटकरींनी आज सकाळी मनसे आणि राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. मनसेकडून शरद पवारांची बृजभूषण सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर अमोल मिटकरींनी खोचक ट्वीट करत राज ठाकरेंचा शरद पवारांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. “आधारवड”. पवार साहेब! (काही फोटो चांगलेही असतात आणि खरेही! हिंदीत भाषांतर जाणीवपूर्वक टाळले आहे)”, असा संदेश ट्वीटसोबत मिटकरींनी लिहिला आहे.