घरमहाराष्ट्रअमरावतीत बसपा कार्यकर्त्यांनीच पदाधिकाऱ्यांना धू धू धुतलं

अमरावतीत बसपा कार्यकर्त्यांनीच पदाधिकाऱ्यांना धू धू धुतलं

Subscribe

अमरावतीत आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उत्तरप्रदेशातून महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, महाराज प्रभारी संदीप ताजने आणि कृष्णा बैले उपस्थित होते.

अमरावतीमध्ये बहुजन समाज पार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांनी बसपाच्या पदाधिकाऱ्यांना चांगला चोप दिला आहे. सोमवारी अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महाराष्ट्राचे तीन राज्य प्रभारी देखील उपस्थित होते. या बैठकी दरम्यान पदाधिकाऱ्यांनी भाषणाला सुरुवात करताच स्थानिक कार्यकर्ते यांनी गोंधळ उडवला. त्यांनी थेट मंचावर बसलेल्या या पदाधिकाऱ्यांवर खुर्च्या फेकून मारल्या. तसंच त्यांना मारहाण सुध्दा केली. या मारहाणीमध्ये त्यांचे कपडे सुध्दा फाडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडालू असून बसपामध्ये सुरु असलेली पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आढावा बैठक

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात बसपाला एकही जागा मिळाली नाही. तर प्रत्येक निवडणुकीत पक्ष तिकीट विकून पक्षात दलाली करत असून पदाधिकारी केवळ पैसे कमावून समाजाला विकत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. आज अमरावतीत आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उत्तरप्रदेशातून महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, महाराज प्रभारी संदीप ताजने आणि कृष्णा बैले उपस्थित होते.

- Advertisement -

प्रभारींवर खुर्च्यांनी केला वर्षाव

बैठकीला सुरुवात होताच तिन्ही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. तुम्ही पक्षात दलाली करीत आहे. तुमच्यामुळे समाज बदनाम होत आहे असा आरोप करुन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांनी तिन्ही राज्य प्रभारींवर कार्यकर्त्यांनी खुर्च्यांचा वर्षाव करत मारहाण केली. त्यांनी या तिघांचा पाठलाग करत त्यांना मारहाण केली यामुळे काहीकाळ बैठक ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते. शेवटी तिघांनी देखील बैठक ठिकाणावरुन पळ काढला. या घटनेमुळे बसपामधील पक्षांतर्गत वाद समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -