उमेश कोल्हे हत्या प्रकरण; नवनीत राणांच्या आरोपांवर पोलीस आयुक्तांचे उत्तर, ‘हा विषय अतिसंवेदनशील…’

amravati chemist umesh kolhe murder case mp navneet rana allegation amravati police commissioner aarti singh press conference

अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर आज अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अमरावतीचे पोलीस आयुक्त आरती सिंह आणि पालकमंत्र्यांनी उमेश कोल्हे यांच्या हत्येचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यावर आरती सिंग म्हणाल्या की, उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनएआयकडे देण्यात आला आहे. हा विषय अतिसंवेदनशील असल्याने आम्ही सावधपणे तपास करत होतो. हे हत्या प्रकरण आम्ही दाबण्याचा प्रयत्न केला नाही, खासदार नवनीत राणांनी केलेले आरोप खोटे आहे. असं म्हणत पोलीस आयुक्तांनी आरोपांचे खंडन केले आहे.

या प्रकरणात अजूनही एक आरोपी आहे त्याला लवकरचं ताब्यात घेतले जाईल, आत्तापर्यंत या प्रकरणात 7 आरोपींना अटक केली आहे. अमरावती शहरात गुन्हेगारी कमी झाली आहे. ज्यांना धमक्या दिल्या त्यांच्या लेखी तक्रारी आल्या नाहीत. आम्ही त्यांच्याकडे गेलो तरी त्यांनी लेखी तक्रार नोंदवली नाही, पण ज्यांनी धमक्या मिळाल्यात त्याचा तपास करत आहोत, अस स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

अमरावतीमधील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यात पोलीस आयुक्तांना अपयश येत आहे. अमरावतीमध्ये दंगल, दगडफेक, मारहाण आणि कर्फ्यूसारख्या घटना घडल्या. आत्ताही काहींना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, त्यांनी तक्रारी देखील केल्या, या सगळ्याचा विचार व्हायला हवा, याप्रकरणी आता अमरावती पोलीस आयुक्तांचे निलंबन करावे अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. दरम्यान अमरावती मेडिकल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणांकडे याचा तपास करण्यास द्यावा अशी मागणी केली होती. तसेच याप्रकरणी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करावे अशी मागणी केली होती.


रेस्टॉरंटमधील जेवण आता सर्व्हिस फ्री, CCPA कडून गाईडलाईन्स जारी