अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडूंचा विजय; मात्र सत्तेचा कल यशोमती ठाकूरांकडेच

Bachchu Kadu wins Amravati District Bank election

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विजय मिळवला आहे. मात्र, सत्तेचा कल महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर आमने-सामने आले होते. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी पार पडली.

या निवडणुकीचा निकाल आज लागला. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांना २२ मतं मिळाली तर बबलू देशमुख यांना १९ मतं मिळाली. त्यामुळे ३ मतांनी बच्चू कडू विजयी झाले आहेत. यशोमती ठाकूर यांचं सहकार पॅनल ८ जागांवर तर बच्चू कडू यांचं परिवर्तन पॅनल ४ आणि अपेक्ष उमेदवारांनी ३ जागांवर विजय मिळवला आहे. तसंच बिनविरोध निवडणून आलेले ४ उमेदवार हे सहकार पॅनलचे दोन तर परिवर्तन पॅनलचे दोन असे चार उमेदवार बिनविरोध ठरले होते.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार

विरेंद्र जगताप – चांदूर रेल्वे
श्रीकांत गावंडे – धामणगाव
सुरेश साबळे – तिवसा
सुधाकर भारसाकडे – दर्यापूर
हरिभाऊ मोहोड – भातुकली
सुनील वऱ्हाडे – अमरावती
दयाराम काळे – चिखलदरा
प्रकाश काळबांडे – सहकारी पतसंस्था

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार

बच्चू कडू – चांदूरबाजार
चित्रा डहाने – मोर्शी
अजय मेहकरे – अंजनगाव सूर्जी
जयप्रकाश पटेल – धारणी

अपक्ष विजयी उमेदवार

अभिजित ढेपे – नांदगाव खंडेश्वर
नंरेशचंद्र ठाकरे – वरुड
आनंद काळे – अचलपूर