घरमहाराष्ट्रअमरावतीत आमदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन

अमरावतीत आमदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन

Subscribe

अमरावतीमध्ये कॉंग्रेस आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. तूर, मूग आणि सोयाबीनचे खरेदी केंद्र तातडीने सुरु करावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले आहे.

अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कॉंग्रेस आमदरांनी आज ठिय्या आंदोलन केले. तूर, मूग आणि सोयाबीनचे खरेदी केंद्र तातडीने सुरु करावी यासाठी काँग्रेस आमदारांनी हे आंदोलन केले आहे. जो पर्यंत जिल्हा प्रशासन खरेदी केंद्र सुरु करीत नाहीत तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही असा पवित्रा आमदार व कार्यकर्त्यांनी घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलाच तणाव दिसून आला.

चौदाही तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या घरातील शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र बंद होणार नाहीत असा दावा राज्य सरकार नेहमी करत असत. मात्र अमरावती जिल्ह्यात अद्याप तूर, मूग, उडीद व सोयाबीन खरेदी सुरु झाली नसल्याने आज काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप व यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तातडीने खरेदी केंद्र सुरु करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांमध्ये शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी आमदारांनी केली. तातडीने केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी असमर्थता दाखवली.

- Advertisement -

‘या’ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले

मात्र सर्व ठिकाणचे खरेदी केंद्र मंगळवार पासून सुरु करण्यात यावे या मागणीवर ते ठाम होते. त्यानंतर अचलपूर,तिवसा आणि दर्यापूर या तीन तालुक्यातील उडीद व मुगाचे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र सोयाबीन खरेदी केंद्रांबाबत अखेरपर्यंत निर्णय होऊ शकला नाही. तर इतर तालुक्यांमध्ये लवकरात लवकर केंद्र सुरु करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देऊन आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले. हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -