घरताज्या घडामोडीदहीहंडीला रवी राणांचा मेगाप्लॅन, बॉलिवूड सेलिब्रिटीही घेणार सहभाग

दहीहंडीला रवी राणांचा मेगाप्लॅन, बॉलिवूड सेलिब्रिटीही घेणार सहभाग

Subscribe

राज्यात दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा दहिहंडीचा थरार अनुभवता येणार आहे. कोरोना विषाणूचं सावट असल्यामुळे दहिहंडी हा उत्सव साजरा करायला मिळाला नव्हता. परंतु मुंबईसह राज्यभरात दहीहंडीची तयारी जोरदार सुरु आहे. आमदार रवी राणा यांनीही दहीहंडीचा मेगाप्लॅन केला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीही यामध्ये सहभाग घेणार आहेत.

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची विदर्भस्तरीय दहीहंडीचा मेगाप्लॅन तयार झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला देखील करण्यात येणार आहे. सोबतच या दहीहंडी कार्यक्रमाला सिने अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री रविना टंडन, शक्ती कपूर, तुषार कपूर आणि कृष्णा यांची उपस्थिती राहणार आहे.

- Advertisement -

अमरावतीच्या नवाथे चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला देखील करण्यात येणार आहे. दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकांना लाखो रुपयांचं भरघोस बक्षीस देखील देण्यात येणार आहेत. ही दहीहंडी अमरावती, अचलपूर आणि मेळघाट मधील धारणी येथे होणार आहे.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या या अदभुत आणि ऐतिहासिक दहिहंडीस देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये सहभागी होणारे सर्व गोविंदा पथक आधी आपल्या तिरंगा राष्ट्रध्वजाला सलामी देणार आणि मगच थर रचणार असल्याने देशभक्तीचा महाकुंभ नागरिकांना अनुभवता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ठाण्यात पावसामुळे खड्ड्यात वाढ; आकड्याने गाठला बाराशेचा टप्पा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -