घरCORONA UPDATECoronavirus: प्रकृती खालावल्यामुळे खासदार नवनीत राणा नागपूरमधील हॉस्पिटलमध्ये दाखल

Coronavirus: प्रकृती खालावल्यामुळे खासदार नवनीत राणा नागपूरमधील हॉस्पिटलमध्ये दाखल

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासहीत त्यांच्या परिवारातील तब्बल १२ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवनीत कौर राणा यांच्यावर अमरावती येथे उपाचर सुरु होते, मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आता नागपूर वोकहार्ट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

नवनीत कौर राणा यांना ६ ऑगस्ट रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. खासदार नवनीत राणा यांचे पती आमदरा रवी राणा त्यांची दोन्ही मुले, सासू-सासरे असे १२ जण सध्या कोरोनाशी संघर्ष करत आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर देखील नागपूरच्या वोकहार्टमध्ये उपचार सुरु आहेत. तर मुलांवर अमरावतीच्या घरीच उपचार केले जात आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या काळात राणा पती-पत्नी खासदार-आमदार या नात्याने मतदारसंघात सतत फिरत होते. अनेक गावांत जाऊन त्यांनी प्रत्यक्ष मदतीचे काम केले. यावेळी त्यांच्या संपर्कात अनेक कार्यकर्ते आणि सामान्य लोक येत असत. यातूनच राणा कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -