Amravati violence: १२ तारखेच्या घटनेवर यशोमती ठाकूर गप्प का?, हिंसा घडवण्यात आली का? फडणवीसांचे सवाल

Amravati violence: १२ तारखेच्या घटनेवर यशोमती ठाकूर गप्प का?, हिंसा घडवण्यात आली का? फडणवीसांचे सवाल

अमरावतीमध्ये एका विशिष्ट गटाकडून हिंसाचार पेटवण्यात आला असल्याचा संशय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अमरावतीमध्ये १३ नोव्हेंबरला जो हिंसाचार उफाळला तो १२ नोव्हेंबरला घडलेल्या घटनेवर आधारित होता. १२ तारखेला मोर्चे काढण्यात आले त्यामध्ये दगडफेक करण्यात आली त्यामुळे ही घटना सुनियोजित होती असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. १२ तारखेच्या घटनेवर राज्य सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकून गप्प का आहेत. केवळ मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी मौन धारण केलय का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमधील दंगलीच्या घटनेचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले की, अमरावतीमध्ये १२ तारखेला मोर्चा निघाला पहिल्यांदा याला परवानगी होती का नव्हती, होती तर किती लोकांची परवानगी होती, परवानगी दिली होती का नव्हती, कोणी परवानगी दिली याची चौकशी झाली पाहिजे, हा मोर्चा झाल्यानंतर समाज कंठकांनी दुकाने, लोकांना टार्गेट केले यातून स्पष्ट दिसत आहे की, दंगा घडवायचा होता त्यामुळे विशिष्ट लोकांच्या आणि धर्माच्या दुकानावर दगडफेक करण्यात आली. आणि त्यातून मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली. १३ तारखेला जी हिंसा झाली ती १२ तारखेची रिएक्शन होती. मी त्या घटनांचे समर्थन करत नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अमरावतीमध्ये १२ तारखेची घटना घडली नसती तर १३ ची घटना घडली नसती असे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारची सगळी कारवाई ही १२ तारखेच्या घटनेवर चालली आहे. त्यावर एकही सरकारी पक्षाचा नेता बोलायला तयार नाही. चुकीच्या घटनेकरता लांगुलचालन होत असले तर आम्ही शांत बसणार नाही. एकीककडे अशा प्रकारे न घडलेल्या घटनांवर टार्गेट करायचे आणि दुसऱ्या घटनेच्या कारवाईवर एका बाजूने कारवाई झाली आहे हे योग्य नाही आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारण्यात येत आहे. नेत्यांना अटक करण्यात आली एकाच घनटेसाठी ४ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

जे लोकं या प्रकरणात नव्हते त्यांनाही अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे अनेक लोकांना एकतर्फी केस लावण्यात आले आहेत. टार्गेट करुन याद्या तयार करणे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लाखणीला अधिवेशन होते त्या अधिवेशनात गेलेल्या लोकांची नावे घेऊन टार्गेट करण्यात येत आहे. आमचे अतिशय स्पष्ट मत आहे की, १२ तारखेची घटना डिलीट करुन १३ च्या घटनेला त्यांचा संबंध नसताना ते हिंदूत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. एवढे एका कारणामुळे त्यांना यामध्ये अटक करण्यात येतंय हे चुकीच असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. शांती महत्त्वाची असते त्यामुळे आम्ही तुम्हाला पुढे जाऊन मदत करु पण, पोलीस एकतर्फी कारवाई करत असतील तर या कारवाईचा निषेध करायला तयार आहोत. जर एकतर्फी कारवाई करत असतील तर भाजपकडून जेलभरो आंदोलन करु, आत टाकायचे असेल तर सगळ्यांनाच टाका, गृहमंत्र्यांना आवाहन आहे की, एकतर्फी जी कारवाई सुरु आहे ती बंद झाली पाहिजे. १३ तारखेला फोकस केले तरी १२ तारखेच्या घटना घडत राहतील आणि विनाकारण चुकीचे असले तरी त्यावर प्रतिक्रिया म्हणून १३ ची घटना घडत राहतील. यामुळेच १३ तारखेची घटना घडू नये तशीच १२ ची घटना घटू नये असे आम्हाला वाटत आहे. या घटनांचे आम्ही निषेध करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


हेही वाचा : अमरावतीमध्ये हिंसाचारावर एकतर्फी कारवाई करत भाजप नेत्यांना अटक, फडणवीसांचा आरोप