घरताज्या घडामोडीamravati violence: महाराष्ट्रातील मोर्चे दंगल सुनियोजीत षडयंत्र, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

amravati violence: महाराष्ट्रातील मोर्चे दंगल सुनियोजीत षडयंत्र, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Subscribe

महाराष्ट्रातील मोर्चे आणि दंगल हे सुनियोजीत षडयंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्रिपुरामध्ये घटना झाल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे पंरतु तिकडे हिंसाचार झालाच नाही असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. तसेच सरकारी पक्षाचे नेते व्यासपीठावर जाऊन भडकवण्याचे भाष्य करत असतील तर या दंगलीची जबाबदारीही सरकारवर येईल. महाराष्ट्रात मोर्चा काढू नये आणि शांतता पाळावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमधील दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, त्रिपुरामध्ये घटना झाल्यानंतर अशा प्रकराचा उद्रेक इथे होता कामा नये, तुम्ही इथली शांतात भंग करत असाल तर महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. कारण अशा प्रकारे जातीय तणाव महाराष्ट्रात जर होणार असेल तर योग्य राहणार नाही. मग अशा प्रकारची प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडतेय इथे दादागिरी कराल तर महाराष्ट्रात चालणार नाही, महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अन्यथा हाताबाहेर प्रकरण जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील मोर्चे आणि दंगली हे सुनियोजित षडयंत्र आहे. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्रिपुरा सरकारने आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वतःजी मशीद जाळली म्हणून हे आंदोलन होत आहेत. त्या मशीदीचे फोटो देखील प्रसारित केले आहेत. हे सगळं सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला आहे. त्यांना अटक करण्यात आला आहे.

त्यामुळे कुठलीही मशीद त्रिपुरामध्ये जाळली गेली नाही असे असताना, त्या संबंधांच्या घटनांवर महाराष्ट्रात मोर्चे काढायचे आणि हिंदूंची दुकाने जाळायची हे योग्य नाही. सरकारने त्यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारी पक्षाचे नेते व्यासपीठावर जाऊन भडकवण्याचे भाष्य करत असतील तर या दंगलीची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कोणीही महाराष्ट्रात दंगल करु नये आणि अशा प्रकारे मोर्चे काढून हिंदूंची दुकाने टार्गेट करु नये आणि शांतता पाळली पाहिजे असे आमचे मत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अमरावतीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न, विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा – वळसे-पाटील


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -