Amravati violence: अमरावतीमध्ये हिंसाचारावर एकतर्फी कारवाई करत भाजप नेत्यांना अटक, फडणवीसांचा आरोप

Amravati violence devendra fadnavis comment on amaravati violence government do partial enquiry
Amravati violence: अमरावतीमध्ये हिंसाचारावर एकतर्फी कारवाई करत भाजप नेत्यांना अटक, फडणवीसांचा आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेतला. या हिंसाचाराच्या घटनेवर पोलीस प्रशासन कारवाई करत असून ही कारवाई एकतर्फी करण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. तसेच फडणीस म्हणाले की, १३ नोव्हेंबरला घडलेली घटना ही १२ नोव्हेंबरल्या घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे १२ तारखेला काय घडलं याची चौकशी झाली पाहिजे. पोलीस एकतर्फी कारवाई करत असून राज्य सरकारने १२ नोव्हेंबरच्या घटनेवर मौन धारण केलं आहे. हिंसाचाराची घटना दुर्दैवी असून आम्ही कोणत्याही घटनेचं समर्थन करत नाही असे फडणवीस म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी हिंसाचार घडलेल्या ठिकाणी जाऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस म्हणाले की, अमरावतीमध्ये जो काही घटनाक्रम झाला तो दुर्दैवी आहे. मोर्चा चुकीच्या माहितीच्या आधारे आणि जाणीवपुर्वक मोर्चा काढ्यात आला. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्याचे सोशल मीडियावर फेक क्रिएटीव तयार करुन कुठेतरी मशिदी तोडण्यात आल्या असे फेक तयार करण्यात आले. त्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला जी मशीद जळते असे दाखवण्यात आले ते त्रिपुरामधील सीपीआयच्या कार्यालयाचे फोटो होते. जे कुरान जाळताना दाखवण्यात आले ते दिल्लीतील आग लागलेल्या घटनास्थळीचे होते.

काही रोहिंग्यांचे आणि काही पाकिस्तानमधील फोटो होते. अशा फोटोंचा वापर करुन देशभरात जाणीपुर्वक एक घटना तयार करुन समाजाला भडकवण्यात आले. आमचे स्पष्ट मत आहे की, इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात हे मोर्चे एकाच वेळी काढण्यात आले आहेत. ते योग्य प्रकारे योजना करुन नियोजित प्रकारे काढलेले मोर्चे आहेत. नांदेड, मालेगाव अमरावतीमध्ये एकाचवेळी मोर्चे निघाले याची चौकशी झाली पाहिजे. फेक माहितीच्या आधारावर कोणी मोर्चे काढले, भूमिका काय होती, महाराष्ट्रात आणि देशात अराजकता तयार झाली पाहिजे, सामाजिक सद्भाव बिघडला पाहिजे. दंगे झाले पाहिजे अशा मानसिकतेतून कट रचण्यात आला होता का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

अमरावतीमध्ये १२ तारखेला मोर्चा निघाला पहिल्यांदा याला परवानगी होती का नव्हती, होती तर किती लोकांची परवानगी होती, परवानगी दिली होती का नव्हती, कोणी परवानगी दिली याची चौकशी झाली पाहिजे, हा मोर्चा झाल्यानंतर समाज कंठकांनी दुकाने, लोकांना टार्गेट केले यातून स्पष्ट दिसत आहे की, दंगा घडवायचा होता त्यामुळे विशिष्ट लोकांच्या आणि धर्मचांच्या दुकानावर दगडफेक करण्यात आली. आणि त्यातून मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली. १३ तारखेला जी हिंसा झाली ती १२ तारखेची रिएक्शन होती. मी त्याघटनांचे समर्थन करत नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : अमरावती हिंसाचारात रझा अकादमीसह भाजपा, युवासेनेचाही समावेश? पोलिसांचा गृह विभागाला अहवाल