घरमहाराष्ट्रCorona: अमरावतीत कहर! विद्यापीठानंतर महापालिकेतील ८० कर्मचारी बाधित

Corona: अमरावतीत कहर! विद्यापीठानंतर महापालिकेतील ८० कर्मचारी बाधित

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून कोरोनाचा कहर कायम दिसत आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ५६ विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अमरावती शहराचं आरोग्य आणि स्वच्छता सांभाळणाऱ्या महापालिकेतील ८० कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. एकाच शासकीय कार्यालयातील बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात असल्याने अमरावतीत कोरोनाची दहशत पुन्हा वाढू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण बाधित कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांमध्ये झोन क्रमांक १,२ आणि ३ चे सहायक आयुक्त, शहर अभियंता, सिस्टीम मॅनेजर, विधी अधिकारी, डेप्युटी इंजिनिअर, डॉक्टर, लिपिक इत्यादींचा समावेश आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गेल्या दिवसभरात ६७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र वाढती कोरोना बाधितांची संख्या चिंतेत भर पाडणारी आहे.

- Advertisement -

अमरावतीतील हे आहेत हॉटस्पॉट

अमरावती शहरातील कार्यालयात कोरोनाचा फैलाव होत असताना ते कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.अमरावती महापालकेतील तब्बल ८० कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने शहराची चिंता अधिक वाढली आहेत. अमरावती शहरातील साईनगर, राजापेठ, दस्तुर नगर,अर्जुन नगर, श्याम नगर, कॅम्प, रुख्मिणी नगर, अंबापेठ हे भाग कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -