घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविधान परिषद निवडणूक : धुळ्यात मविआ उमेदवार वाणींसमोर भाजपच्या पटेलांचं आव्हान

विधान परिषद निवडणूक : धुळ्यात मविआ उमेदवार वाणींसमोर भाजपच्या पटेलांचं आव्हान

Subscribe

धुळे – विधान परिषद निवडणुकीत भाजपने अनुभवी अमरिश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पटेल यांचा पूर्वानुभव पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. भारतीय जनता पक्षाची मतदारसंख्या १९९ इतकी आहे. महाविकास आघाडीची मतदारसंख्या कमी झाली आहे. महाविकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या धडगाव आणि साक्रीमध्ये नगरपंचायत स्थापन झाल्याने महाविकास आघाडीची ३४ मते कमी झाली आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो असे राजकिय तज्ञांचे मत आहे. गत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपने अनुभवी विद्यमान आमदार अमरिश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यातुलनेत प्रतिस्पर्धी उमेदवार अगदी नवखे आहे. महाविकास आघाडीने एकोप्याने प्रयत्न केल्यास भाजपलाही ही निवडणुक तितकीशी सोपी नाही त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते काय भुमिका घेतात यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. पटेल यांनी आपण २१५ मतांनी विजयी होऊ असा दावाही केला आहे.

असे आहे पक्षीय बलाबल

  • भाजप – १९९
  • काँग्रेस – १३६
  • राष्ट्रवादी – २०
  • शिवसेना – २०
  • एमआयएम – ९
  • समाजवादी – ४
  • बसप -१ 
  • मनसे – १
  • अपक्ष – ९
  • एकूण – ३९९
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -