Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पश्चिम रेल्वे मार्गावरील 'या' स्थानकांचा होणार कायापालट

पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘या’ स्थानकांचा होणार कायापालट

Subscribe

पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ८५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास करण्याची घोषणा केली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल स्थानकाचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ८५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील १ हजार २७५ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास करण्यात येणार आहे. (Amrit Bharat Station Yojana Mumbai Central Railway Station Redeveloped 850 Crore Provision Tender)

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाच्या कामासाठी एप्रिल महिन्यात निविदा जाहीर करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या १५ तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली आहेत. याकरिता यंदाच्या अर्थसंकल्पात ८५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासच्या कामाचा आरखडा तयार करण्याचे काम सुरु आहेत. शिवाय, एप्रिल महिन्यात निविदा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहेत.

- Advertisement -

‘या’ १२ स्थानकांचा होणार पुर्नविकास

अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, चर्नी रोड, दादर, ग्रॅन्ट रोड,जोगेश्वरी, लोअर परळ, मालाड, प्रभादेवी, मरीन लाइन्स आणि मुंबई सेंट्रल

- Advertisement -

‘असा’ करणार पुर्नविकास

स्थानकांचा पुनर्विकास करताना रुफ प्लाझाची सुविधा देणार येणार असून त्यात स्टॉल, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे. स्थानकांतील प्रवेशद्वारांची लांबी-रुंदी वाढवणे, स्थानकाच्या दर्शनी भाग, रेल्वेच्या हद्दीतील वर्दळीचा परिसर, प्लॅटफॉर्मवरील छत, ड्रेनेजची सुधारणा करण्यात येणार आहे. नवीन प्रसाधनगृह, स्थानकात अन्य प्रवेशद्वारासाठी नियोजन, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.


हेही वाचा – थोरातांचा वाद चिघळू देऊ नका, अन्यथा भाजपला आयती संधी मिळेल; ‘सामना’तून काँग्रेसला सल्ला

- Advertisment -