घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या स्थैर्य, समृद्धीसाठी अमृता फडणवीस लंडनमध्ये, पाहा फोटो

महाराष्ट्राच्या स्थैर्य, समृद्धीसाठी अमृता फडणवीस लंडनमध्ये, पाहा फोटो

Subscribe

महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे उलथापालथ पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत आता महाविकास आघाडी सरकार कुठल्याही क्षणी पडणार हे निश्चित झाले आहे. यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या परिस्थितीत शिवसेनेने बहुम चाचणीविरोधात कोर्टात धाव घेतल्याने आता बहुमत चाचणीबाबत काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या राजकीय घडामोडींमध्ये आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच एक ट्विट चर्चेत आले आहे. अमृता फडणवीस याा लंडनमध्ये आहेत. यावेळी लंडनमधील प्रसिद्ध स्वामीनारायण हिंदू मंदिराला त्यांनी भेट देत पूजा केली. यावेळी गणरायाकडे त्यांनी महाराष्ट्रातील सध्यस्थितीबाबत मागणं मागितलं आहे.

अमृता फडणवीस या नेहमीच राज्यातील राजकीय घटमोडींवर अगदी हटके पद्धतीने प्रतिक्रिया देत असतात. तर अनेकदा महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर टीकास्त्र डागत असतात. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी भाजप नेत्यांप्रमाणे मौन बाळगणं पसंत केलं होते. अशात त्यांच हे नव ट्विट आता अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना मिसेस फडणवीस लंडनमध्ये काय करतायत असा सवाल अनेकांकडून उपस्थित होत आहे. अमृता फडणवीस या नेहमीच राज्यातील राजकीय घटमोडींवर अगदी हटके पद्धतीने प्रतिक्रिया देत असतात. तर अनेकदा महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर टीकास्त्र डागत असतात. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी भाजप नेत्यांप्रमाणे मौन बाळगणं पसंत केलं होते. अशात त्यांच हे नव ट्विट आता अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

नमस्ते #लंडन ! नावाने अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमृता फडणवीस यांनी लिहिले की, लंडनला उतरलो आणि #BAPS स्वामीनारायण हिंदू मंदिराला भेट दिली. परदेशातील पहिले सर्वात मोठे हिंदू मंदिर असून येथे विशेष पूजा केली. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. आपण लोकशाहीचा मंत्र कधीही विसरु नये. लोक आधी, पक्ष नंतर , आणि स्वत; शेवटी 🙏 असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आणि मंदिराच्या भेटीचे काही फोटोही शेअर केले.


माझ्याच लोकांनी मला फसवलं, सहकार्याबद्दल धन्यवाद, मुख्यमंत्री भावूक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -