घरमहाराष्ट्रअमृता फडणवीस फसवणूक प्रकरण : उल्हासनगरमधून ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षाला अटक

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण : उल्हासनगरमधून ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षाला अटक

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी उल्हासनगरमधील बुकी अनिल जयसिंघानी यांच्या घरावर आज छापा टाकत त्यांची मुलगी अनिक्षा हिला ताब्यात घेतले आहे.

अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून उल्हासनगरमधील बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी बुकी अनिल यांनी मुलगी डिझायनर अनिक्षा आणि मुलगा अक्षन दोघेही घरात होते. मुलगी अनिक्षा हिच्या विरोधात अमृता फडणवीस यांनी मलबार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही छापेमारी केली.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला अटक केली असून दुसरा आरोपी आणि बुकी अनिल जयसिंघानीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा बुकी अनिल जयसिंघानी यांच्या दोन्ही मुलांनी पोलीस चौकशी टाळ्याचा प्रयत्न केला. मुलगा अक्षन याने प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल झाला असल्याचा दावा केला, तर मुलीने आपल्या परीक्षा सुरू असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या मुलीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -