घरताज्या घडामोडीगणेश चतुर्थीपूर्वी अमृता फडणवीसांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

गणेश चतुर्थीपूर्वी अमृता फडणवीसांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

तुमचे पुढचे गाणे कधी येणार? असा प्रश्न विचारला असता त्यांनी गणेश चतुर्थी आधी येणाऱ्या नव्या गाण्याची घोषणा केली.

सोशल मीडियावर प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या गाण्यांची देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू असते. येत्या गणेश चतुर्थीला अमृता फडणवीस त्यांच्या चाहत्यांसाठी नवे गाणे घेऊन येत आहेत. (Amruta Fadnavis new song before Ganesh Chaturthi)  पुण्यात एका कार्यक्रमासाठी अमृता फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘आगामी गणेश चतुर्थीच्या आधी माझे नवी गाणे येणार’, असल्याचे अमृता फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे अमृता फडणवीस आता गणेश चतुर्थीला कोणते नवे गाणे घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गुरुवारी पुण्यात धागा हॅन्डलूम महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ अमृता फडणवीसांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांना तुमचे पुढचे गाणे कधी येणार? असा प्रश्न विचारला असता त्यांनी गणेश चतुर्थी आधी येणाऱ्या नव्या गाण्याची घोषणा केली. पत्रकारांनी अमृता फडणवीसांना गाणे ऐकवण्याची मागणी केली मात्र नेक्ट टाइम नक्की म्हणेन असे उत्तर अमृता फडणवीसांनी दिले.

- Advertisement -

अमृता फडणवींस या एक प्रोफेशन गायिका असून आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्यातून त्या नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करताना दिसतात. अमृता फडणीसांचे ‘कुणी म्हणाले वेडी कुठली कुणी म्हणाले खुळी’ हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले होते. या गाण्यातून अमृता यांचा नऊवारी साडीतील मराठमोळा लुक पहायला मिळाला होता. त्याचप्रमाणे त्यांना ट्रोल देखील करण्यात आल्या होत्या. अमृता फडणवीस त्यांच्या ट्रोलर्सना देखील सडेतोड उत्तर देताना दिसल्या होत्या.

अमृता फडणवीसांच्या धागा हॅन्डलूम महोत्सव उद्घाटन समारंभावेळी पुणेकरांशी संवाद साधला. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करुन सर्वांनी शॉपिंग करा. मुंबईत अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र पुण्यात का नाही? पुण्यातील रुग्णसंख्येचा दर केवळ ४ टक्के असूनही नियम शिथिल का झाले नाही? असा प्रश्न त्यांनी वेळी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘शेरशाह’ मधील ‘रांझा’ गाण्यामध्ये कियारा आणि सिद्धार्थ झळकले रोमँटिक अंदाजात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -