शहर मे हर मोड पर गड्ढे-तालाब, अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबईच्या तुंबईवरुन अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

Amrita Fadnavis slams Thackeray government on pothole and ponds on road
शहर मे हर मोड पर गड्ढे-तालाब, अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगरांत पावसाने जोर धरला होता. रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईतील रस्तेवाहतुक आणि रेल्वे वाहतुक काही तास कोलमडली होती. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रासही सहन करावा लागला आहे. मुंबईत प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर खड्डे आणि रस्त्यावर तळं साचलेलं दिसतं अशा शब्दात शिवसेना आणि ठाकरे सरकारवर अमृता फडणवील यांनी टीका केली आहे. अमृता फडणवीस या शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही यावेळी त्यांनी मुंबईच्या तुंबईवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

पावसाळा आला की दरवर्षी मुंबईची तुंबई होते यावरु राजकारणंही केलं जात. मुंबई तुंबलेल्या स्थितीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यावरुन अमृता फडणवीस यांनी, इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब,पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब, असे ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, शहरात प्रत्येक वळणावर पाणी साचलेले खड्डे पाहायला मिळतील परंतु शोधल्यास एकही गुन्हेगार सापडणार नाही असा टोला लगावला आहे. तसेच त्यांनी आपला एक फोटो ट्विटमध्ये जोडला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस या पाणी साचलेल्या रस्त्यावर मध्यभागी जमिनिकडे अंगठा दाखवत उभ्या आहेत. अमृता फडणवीस यांनी प्रशासनाच्या कामाजाचा अंगठा खालच्या दिशेने दाखवून निषेध केला आहे.