जिलेबी कितीही आडवळणी असो पण.., फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीसांचं खास ट्विट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक राजकीय मंडळींनी आणि सर्व सामान्यांनाही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खास ट्विट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते, अशा प्रकारचं ट्विट अमृता फडणवीस यांनी करत त्यांना जिलेबी भरवतानाचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे.

अमृता फडणवीसांचं ट्विट काय?

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, अशा शब्दांत त्यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस हे तळागाळाशी जोडलेले नेते असून लोकांची सेवा करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांचं कौतुक केलं जातं. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यायासाठी प्रार्थना, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या ट्विटवरून अनेकदा वादंग निर्माण झाला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्ता स्थापनेच्या काळात अमृता फडणवीस विरुद्ध ठाकरे कुटुंब असा शाब्दिक सामना महाराष्ट्राने पाहिला आहे. तसेच त्या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात.


हेही वाचा : पूरस्थितीच्या संकट काळात राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी द्या, सतेज पाटलांची