घरमहाराष्ट्रअमृत मलमचे सर्वेसर्वा शैलेश जोशींची आत्महत्या

अमृत मलमचे सर्वेसर्वा शैलेश जोशींची आत्महत्या

Subscribe

तरुण उद्योजक आणि अमृत फार्मास्युटिकल्स या कंपनीचे संचालक शैलेश जोशी (वय ४०) यांनी छातीवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी बेळगावातल्या गणेशपूरमधील राहत्या घरी मध्यरात्री २ च्या सुमारात स्वतःवर गोळी झाडली. शैलेश जोशी यांच्या आत्महत्येने बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. कॅम्प पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

‘माझ्या मृत्यूला मीच जबाबदार’

शैलेश यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या सुसाईड नोटमध्ये ‘माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. पत्नी आणि मुलींवर माझे खूप प्रेम आहे’, असं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येभोवतीचं गूढ वाढू लागलं आहे.

कोण होते शैलेश जोशी?

  • जगप्रसिद्ध अमृत मलम ब्रँडचे मालक
  • बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशींचे सुपुत्र
  • बेळगावमध्ये व्यसनमुक्तीसाठीच्या कार्यात योगदान
  • केएलई फार्मसी महाविद्यालयातून शिक्षण
  • सेंट मेरीज स्कूलमधून शालेय शिक्षण
  • पोतदार क्रिकेट क्लबचे मालक
  • अनेक सामाजिक संघटनांशी संबंध
  • भाजपमध्ये प्रवेश करुन राजकीय कारकिर्दीची केली होती सुरुवात
Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -