Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Amruta extortion case : जयसिंघानियाच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

Amruta extortion case : जयसिंघानियाच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अमृता फडणवीस यांना लाच आणि खंडणीच्या गुन्ह्यात मलबार हिल पोलिसांनी काल (गुरूवार) न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या ७३३ पानांच्या आरोपपत्रात १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. तसेच या आरोपींविरोधात आणखी काही पुरावे आढळल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जयसिंघानिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनिक्षानं फॅशन डिझायनर असल्याचे सांगून जवळीक साधत गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी मदतीची मागणी केली. त्याबदल्यात बुकींकडून सट्टातून मिळणारे पैसे आणि मदत करण्यासाठी एक कोटी रुपये देऊ केले. त्याचप्रमाणे बनावट ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप पाठवून त्याआधारे ब्लॅकमेल करीत १० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करत फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणीच पोलिसांनी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी केलेल्या आरोपानुसार, अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची ऑफर दिली होती आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलही केलं होतं. या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी याला २० मार्च रोजी गुजरातमध्ये अटक करण्यात आली. वडील अनिल जयसिंघांनी आणि मुलगी अनिक्षा दोघांनी मिळून अमृता फडणवीसांना फसवण्यासाठी पुरेपूर प्लॅन केला होता. कोणताही मेसेज पाठवण्याआधी ते एकमेकांशी चर्चा करत होते.

कोण आहे अनिक्षा जयसिंघानी?

- Advertisement -

अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अनिक्षाने दावा केला की, ती कपडे, दागिने आणि शूज डिझाइन करते. अनिक्षाने उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिच्या डिझाईन केलेल्या अॅक्सेसरीज घालण्याची, तिच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी आणि विक्रीत मदत करण्याची विनंती केली होती.


हेही वाचा : मोठी बातमी! अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर


 

- Advertisment -