घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या रेशमी साम्राज्यात जगणारी अळी म्हणजे आदित्य ठाकरे , अमृता फडणवीस यांचा...

बाळासाहेबांच्या रेशमी साम्राज्यात जगणारी अळी म्हणजे आदित्य ठाकरे , अमृता फडणवीस यांचा पलटवार

Subscribe

अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले आहे.

तुमच्या पुर्वजांनी मिळवून दिलेले आरामदायी आयुष्य तुम्ही जगत आहात. तुमच्यासारख्या कमकुवत व्यक्तीला मेहनत काय कळणार अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बांगड्या भरण्याच्या कमेंटसाठी माफी मागण्याच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी ही कमेंट केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे भाजपसाठीचे योगदान आणि मेहनत याचे कौतुक करताना अमृता फडणवीस यांनी आपल्या पतीच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना एका आरामातल्या राजवटीत जगणारी अळी असे संबोधले आहे. आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवलेल्या साम्राज्यावर ते जगत आहेत असेही त्यांनी कमेंटमध्ये म्हंटले आहे.

- Advertisement -

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी निदर्शनं, घोषणाबाजी आणि सभागृहातील प्रश्नोत्तरं या माध्यमातून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, आक्रमक भूमिका घेताना या नेत्यांकडू केली जाणारी वक्तव्य वादात सापडत आहेत. भाजपतर्फे मंगळवारी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यभर निषेघ मोर्चे काढले. यावेळी आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी परखड टीका करत माफीची मागणी केली आहे.

मी उलट बोलत नाही पण…

- Advertisement -

आझाद मैदानात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन सरकारवर टीका केली होती. ‘१५ कोटी १०० कोटींवर भारी पडतील, स्वातंत्र्य मिळत नसेल तर ते हिसकावून घ्यावं लागेल’, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही घातलेल्या नाहीत. जर कुणी काही म्हटलं, तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. भाजपकडे तेवढी ताकद आहे’, असं फडणवीस म्हणाले होते.


हे ही वाचा – देवेंद्र फडणवीसजी, बांगड्यांच्या वक्तव्यावर माफी मागा – आदित्य ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -