घरमहाराष्ट्र"देवेंद्र अकेले नही पुरी कायनात उनके साथ है" मिसेस फडणवीसांनी केलं देवेंद्र...

“देवेंद्र अकेले नही पुरी कायनात उनके साथ है” मिसेस फडणवीसांनी केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

Subscribe

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपचं पुढील लक्ष 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रणणीती आखायला सुरूवात केलीये. दरम्यान, राज्यसभेच्या विजयाचा जल्लोष साजरा करतांना  त्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला विरोधी पक्षाच्या बाकावर बसवू असा द्दढ विश्वास यावेळी व्यक्त केला. यानंतर फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील त्यांचं कौतुक करत “अब देवेंद्र अकेले नहीं, पुरी कायनात उनके साथ हैं”, असं वक्तव्य केलं आहे. (Amruta Fadnavis complimented Devendra Fadnavis)

काय म्हणाल्या अमृता फडणवीस

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत विजय हा भाजपचाच होईल असा आत्मविश्वास व्यक्त केलाय. एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपला मिळालेल्या या विजयाचं स्वागत केलं आहे. तसेच पियुष गोयल , अनिल बोंडे आणि धनंजय महाडिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन. ज्या अपक्ष आमदारांनी भाजपला साथ दिली त्या सर्वांचे आभार. हा सत्याचा विजय आहे”,अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलीये.

- Advertisement -
शिवसेनेचा खरा पराभव सुरू झाला- अमृता फडणवीस

तसेच यावेळी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ही शिवसेनेच्या पराभवाची नांदी आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तेव्हा सेनेचा खरा पराभव आता सुरू होईल अशी जहरी टीका त्यांनी केलीये

राज्यसभेच्या रणधुमाळी मध्ये तब्बल 9 तासांनंतर सस्पेन्स संपला. या निवडणुकीत  सहाव्या जागेसाठी चुरशीची लढत सुरू होती. दरम्यान ,भाजपचे धनजंय महाडिक यांनी बाजी मारली.

- Advertisement -

 


हे हि वाचा – …म्हणून अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही, दीपाली सय्यद यांचा फडणवीसांना टोला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -