Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'एक राजा जो महल की चौखट से निकलता नही'; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर...

‘एक राजा जो महल की चौखट से निकलता नही’; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. यावरुन राज्य सरकार आणि भाजमध्ये जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राला केंद्र कमी लस देतंय, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. तसंच, सध्या राज्याच्या राजकारण जे काही चालू आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मौन बाळगून आहेत, असं भाजपचे सर्वच नेते बोलत आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील शायरीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एक शायरी लिहिली आहे. त्यात मुख्यमंत्री कसे घरात बसून राज्य चालवतात. तसंच काही दिवसापूर्वी परमबीर सिंग यांनी जे वसूलीचे आरोप केले त्याचा देखील उल्लेख त्यांनी त्यांच्या शायरीमध्ये केला आहे.

- Advertisement -

“पहचान कौन?
एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही,
अवाम से कभी मिलता नही
सत्य और कर्म की राह पर चलता नही
वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही
महामारी का कहर उससे सम्हलता नही
प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही!
सच है, धोखा कभी फलता नही।
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?

अशी शायरी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -