घरताज्या घडामोडी'क्या उखाडेगी बुल्डोजर सरकार?' अमृता फडणवीसांची शेरो शायरी

‘क्या उखाडेगी बुल्डोजर सरकार?’ अमृता फडणवीसांची शेरो शायरी

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आता ट्विटरवर पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. दोन दिवसांपुर्वी त्यांनी बार आणि मंदिराच्या निर्णयावरुन सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांनी आम्ही तोंड उघडले तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, असे म्हटले होते. या टीकेला आता अमृता फडणवीस यांनी शेरो-शायरीच्या अंदाजात उत्तर दिले आहे. तसेच राज्य सरकारला जेसीबी सरकार असे हिणवून तुम्ही काय उखाडणार? असाही प्रश्न विचारला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मंदिरे खुले करण्यावरुन झालेला पत्र प्रपंच जगजाहीर झाला. त्यानंतर कुणी कुणाला कसे फटकारले याची खमंग चर्चा रंगली होती. या चर्चेत मध्येच अमृता फडणवीस यांनी ट्विट टाकले. वाह प्रशासन म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी खरमरीत उत्तर देत, “ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? नवरा मुख्यमंत्री झाल्यावर ती बोलू लागली”, अशी टीका केली होती.

- Advertisement -

या टिकेचे एक ट्विट रिट्विट करत अमृता फडणवीसांनी पलटवार केला आहे. “मेरे पास ना घर न द्वार,
फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार?” असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे. कंगना रणौतचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बुल्डोजर चालवले होते. त्यावरुन कंगनाने राज्य सरकारला बुल्डोजर चालवणारी सरकार म्हणून संबोधले होते. तिच रि ओढत आता अमृता फडणवीस यांनी देखील टीका केली आहे.

- Advertisement -

विशाखा राऊत यांनी टीका करण्याआधी अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, “वाह प्रशासन! बार, दारुची दुकाने सुरु. मग मंदिर डेंजर झोनमध्ये का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ आहेत. त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते.” असे ट्विट त्यांनी केले होते. या टीकेनंतर विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांना आव्हान दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -