घरमहाराष्ट्रशुद्ध हवा हवी? मग अमृता फडणवीसांना विचारा

शुद्ध हवा हवी? मग अमृता फडणवीसांना विचारा

Subscribe

मुंबई-गोवा मार्गे सुरु करण्यात आलेल्या आंग्रिया क्रूझवर सेल्फी काढल्यामुळे चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काही चुक झाली तर माफ करा असे त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

मुंबई-गोवा दरम्यान क्रूझने प्रवास करते वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टोकावर बसून सेल्फी काढल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या वादावर आता अमृता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काही चुक झाली असेल तर माफ करा असे त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. गोवा प्रवासादरम्यान अमृता यांनी सेल्फी काढल्यामुळे सोशल मीडियावर त्या टीकेच्या धनी ठरल्या. यावर विचारले असता शुद्ध हवेसाठी त्या ठिकाणी बसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमकी शुद्ध हवा याच ठिकाणी मिळते का? असा प्रश्न लोकांकडून केला जात आहे. फडणवीस आंग्रिया क्रूझवर सेल्फी घेत असतानाचा व्हिडिओ पर्यटकाकडून काढण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यमुळे लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस

मी बसली ती जागा धोकादायक नव्हती. जवळपास १० मिनिटे मी त्या जागेवर बसली होती. ज्या ठिकाणी मी बसली होती त्या खाली पायऱ्या होत्या. धोक्याचे काहीच कारण नसल्यामुळे पोलिसांनीही मला अडवले नाही. शुद्ध हवेसाठी मी त्या जागेवर बसले होते. मात्र तुम्ही धोकादायक ठिकाणांवर जाऊन सेल्फी काढू नका. – अमृता फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -