घरमहाराष्ट्रमहिलांनी आरक्षणाने नाही, स्वकतृत्त्वाने पुढे यावं; अमृता फडणवीसांनी मांडली भूमिका

महिलांनी आरक्षणाने नाही, स्वकतृत्त्वाने पुढे यावं; अमृता फडणवीसांनी मांडली भूमिका

Subscribe

महिलांचा राजकारणात सक्रीय सहभाग वाढवण्याकरता संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळायला हवे अशी मागणी विविध स्तरांतून केली जातेय. तसेच, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यासंदर्भातील आज मागणी केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक वेगळाच विचार या माध्यमातून मांडला आहे. आपल्याकडे आधीच खूप आरक्षण आहेत, त्यात महिला आरक्षण नको. त्यापेक्षा महिलांनी स्वतःच्या हिंमतीने निवडून यावं, मग त्यांना मिळणारा मान-सन्मान मोठा असेल, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी माध्यमांशी आज संवाद साधला.

हेही वाचा – १०० व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून ध्वजारोहण करतील, पेडणेकरांचा विश्वास

- Advertisement -

अमृता फडणवीस म्हणाल्या की, महिलांना नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे. पण महिलांनी मंत्रिपदाची डिमांड करण्यापेक्षा पुरुषांएवढीच मेहनत करून त्या पदावर कमांड मिळवली पाहिजे. त्यावेळी महिलांना जास्त आदर मिळेल.
त्या पुढे म्हणाल्या की, आपल्याकडे आधीच खूप प्रकारची आरक्षणे आहेत. त्यामुळे माझं मत आहे की माझई प्रतिनिधी असलेल्या महिलेने मेहनतीने पुढे यावं, ती जागा पटकावावी. त्यामध्ये तिला जो आदर मिळेल तो कशातच मिळणार नाही.

महाराष्ट्र सध्या पायाभूत क्षेत्रात फार मागे आहे. त्यामुळे नव्या सरकारने ही उणीव भरुन काढण्यासाठी दुप्पट मेहनत करावी. नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या काळात महाराष्ट्राने वेगाने घोडदौड करावी, अशा शुभेच्छाही अमृता फडणवीसांनी नव्या सरकारला दिल्या.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारमधील अर्धा डझन मंत्री नाराज; वजनदार नेत्यांना दुय्यम खाती

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठत आहे. मात्र, यावरून अमृता फडणवीसांनी वेगळी भूमिका मांडली. महिलांनी एखाद्या मंत्रिपदाची डिमांड करण्यापेक्षा मेहनत करून कमांड मिळवावी असं त्या म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -