घरताज्या घडामोडीमला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा, अमृता फडणवीसांनी नाकारली सुरक्षा

मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा, अमृता फडणवीसांनी नाकारली सुरक्षा

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वाय प्लस (Y+)दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा अमृता फडणवीस यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. परंतु त्यांना आता ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट वाहन सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा असं ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी सुरक्षा नाकारली आहे.

काय आहे अमृता फडणवीसांचं ट्वीट ?

- Advertisement -

मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. माझी नम्र विनंती आहे की, मुंबई पोलिसांनी मला ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट वाहन प्रदान करू नये, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी करत या सुरक्षेला विरोध दर्शवला आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली नव्हती. परंतु अमृता फडणवीस यांना असलेला धोका लक्षा घेता उच्चस्तरीय समितीने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रॅफिक क्लीयरन्स व्हेईलकची सुद्धा त्यांनी मागणी केली नव्हती. परंतु त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे अमृता फडणवीस कुठेही प्रवास करतील तेव्हा ट्रॅफिक क्लीअरन्स व्हेईकल त्यांच्यासोबत असणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी वाहतूक कोंडीमुळे 3 टक्के घटस्फोट होतात असा दावा केला होता. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना द्यायला वेळच मिळत नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी सुरक्षा नाकारण्यास नकार दिला आहे.


हेही वाचा : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाची खलबतं सुरू; पदाधिकारी, नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -