घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या टीकेला अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या... ''अब्जाधीश फक्त आपणच आहात''

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या… ”अब्जाधीश फक्त आपणच आहात”

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. शिवाय, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. शिवाय, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत. परंतु, अमृता फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. रविवारी झालेल्या महाउत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला. त्यानंतर पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे.

“मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते” असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात”, असं म्हटलं अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग देखील केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान. अमृता फडणवीसांच्या या टीकेला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. आम्ही याकडे जोक म्हणून बघतो. आम्ही अशा चिरकुट लोकांकडे बघतही नाही, असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

- Advertisement -

महाराष्ट्र दिनानिमित्त ठाकरे सरकारने महाउत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचाऱ्यासोबत IAS अधिकाऱ्यांना देखील आपली कला या मंचावर सादर केली. या महाउत्सव प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीस याचं नाव न घेता टोमणा मारला होता. “राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. आजपर्यंत एकच व्यक्ती गाते येतं, असं मला वाटत होतं,” असं म्हणत अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता.


हेही वाचा – Heat Stroke : राज्यात दोन महिन्यात उष्माघातामुळे 25 जणांचा मृत्यू, केंद्राने जारी केल्या महत्त्वाच्या सूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -