अमृता फडणवीसांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा, ट्विट करत विचारला हटके प्रश्न

अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राज्य सरकारवर (State Government) तोफ डागली आहे. सरकारचं नाव न घेता त्यांनी यावेळी हटके पद्धतीने निशाणा साधला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राज्य सरकारवर (State Government) तोफ डागली आहे. सरकारचं नाव न घेता त्यांनी यावेळी हटके पद्धतीने निशाणा साधला आहे.

काय आहे ट्विट?

अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये (Amruta Fadnavis tweet on state government) रिकामा जागा भरण्यास सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी पर्याय दिले आहेत. आज मी… असं लिहित त्यांनी पुढे जागा रिकामी ठेवली आहे. ती जागा भरण्यासाठी त्यांनी पर्याय दिले आहेत.

काय आहेत पर्याय?

  • CoronaPositive आढळले आहे.
  • एक दुःखद प्रेमगीत लिहित आहे.
  • पावसाळ्याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आढावा घेण्याची योजना आखत आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या टीकेला अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या… ”अब्जाधीश फक्त आपणच आहात”

अमृता फडणवीस नेहमीच ठाकरे सरकारवर निशाणा साधत असतात. विविध मुद्द्यांवर त्या आपलं मत व्यक्त करतात. त्यातच त्यांनी आता पावसाळ्यानिमित्ताने उद्भवणाऱ्या समस्यांवर वार केले आहेत. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये ठाकरे सरकारचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा रोख सरकारवरच असल्याचं स्पष्ट होत आहे.

नेटिझन्स काय म्हणत आहेत?

अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) केलेल्या ट्विटवर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. अमृता फडणवीसांचे जसे प्रचंड विरोधक आहेत तसेच त्यांचा मोठा चाहता वर्गही आहे. त्यामुळे या ट्विटच्या कॉमेन्ट बॉक्समध्ये (Comment Box) सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तुम्ही रस्त्यांचा आढावा घेण्यासाठी जात असाल असं अनेकांनी म्हटलं आहे तर अनेकांनी मिश्किलपणे म्हटलं आहे की तुम्ही सध्या काहीही करू नका फक्त देवेंद्र फडणवीसांची काळजी घ्या. तर एकाने म्हटलं आहे की कृपया सध्या कोणतंही प्रेमगीत वगैरे लिहू नका.