अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहिणारा भाजप नेता थेट जिल्ह्यातून हद्दपार

अमृता फडणवीस यांचे नुकतेच प्रसारीत झालेले पंजाबी गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायावर आपले मत व्यक्त केले. वेश्या व्यवसायाला मान्यता देऊन तो अधिकृत करावा, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेत चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिपरी येथील भाजप नेते खेमचंद गरपल्लिवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकली. या पोस्टमुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली. 

Amruta Fadnavis

चंद्रपूरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह व अश्लिल टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्याला हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे.

अमृता फडणवीस यांचे नुकतेच प्रसारीत झालेले पंजाबी गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायावर आपले मत व्यक्त केले. वेश्या व्यवसायाला मान्यता देऊन तो अधिकृत करावा, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेत चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिपरी येथील भाजप नेते खेमचंद गरपल्लिवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकली. या पोस्टमुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली.

खेमचंद यांच्याविरोधात याआधीही गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास उपविभागीय अधिकारी यांनी मंजूर दिली. त्यामुळे खेमचंद यांना चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. खेमचंद व त्यांच्या पत्नीने काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य खेमचंद यांच्या अंगलट आले आहे.

अमृता फडणवीस या नेहमी सोशल मिडियावर active असतात. मकरसंक्राताली पतंगबाजी असो की अजून कोणता सण असो. अमृता फडणीस ह्या त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांची गाणीही रसिकांच्या पसंतीस उतरतात. मध्यंतरी तर त्यांनी अभिनेता अमिता बच्चन यांच्यासोबत एक गाणे केले होते. अगदी स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. उर्फी जावेदवरुन सुरु असलेल्या वादावरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. उर्फीने काही चुकीचे केले नाही, असे मत अमृता फडणवीस यांनी मांडले होते. त्यानंतर वेश्या व्यवसायावरही त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले. वेश्या व्यवसायाला परवाना देऊन अधिकृत करावा असे अमृता फडणवीस यांनी वक्तव्य केले. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. मात्र खेमचंद यांची प्रतिक्रिया आक्षेपार्ह होती. त्यामुळे नाराज भाजप कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांतच याची तक्रार केली. त्यानुसार खेमचंद यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.