फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच अमृता फडणवीसांची पहिली पोस्ट, म्हणाल्या…

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या नंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिलीच पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

विधानपरिषदेची निवडणूक(vidhan parishad election) पार पडल्या नंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. मागील दहा दिवसांपासून सुरु असलेल्या या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. गुरुवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी घडत होत्या त्या आता अखेर थांबल्या आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या नंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस(amruta fadnavis) यांनी पहिलीच पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

आणखी वाचा- नव्या सरकारविरोधात शिवसेना कोर्टात, पण याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

अमृता फडणवीस(amruta fadnavis) ह्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक अश्या अनेक विषयांवर अमृता फडणवीस स्वतःचं मत व्यक्त करत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमृता यांनी आपल्या ट्विट मधून महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट मध्ये अमृता फडणीस यांनी लिहिलं आहे, की ”महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस(deputy CM devendra fadnavis) यांना मनःपूर्वक शुभेच्छा!”

 

आणखी वाचा –  …तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, राऊतांनी स्पष्टच सांगितलं

 

याशिवाय काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस लंडनला गेल्या होत्या. लंडन मध्ये जाऊन तिथल्या हिंदू मंदिरात त्यांनी खास पूजा सुद्धा केली होती. ज्याचे काही फोटो अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. अमृता यांची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती. अमृता फडणवीस यांची प्रत्येक पोस्ट आणि वक्तव्य नेहमीच चर्चेत असते. अमृता फडणवीस यांनी लंडनच्या मंदिरातील फोटो पोस्ट केले तेव्हा त्यावर त्यांनी लिहिलं होतं, की ”नमस्कार लंडन, लंडनला उतरले आणि तिथल्या स्वामीनारायण हिंदू मंदिराला भेट दिली आणि विशेष पूजा केली. परदेशातील पहिले सर्वात मोठे हिंदू मंदिर! महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. लोकशाहीचा मंत्र आपण कधीही विसरू नये; जनता सर्वात आधी, नंतर पक्ष आणि शेवटी आपण स्वतः.”

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

 

आणखी वाचा – शपथविधी होताच शिंदे पोहोचले गोव्यात, बंडखोर आमदारांकडून नव्या मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत

 

या सगळ्या मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची भूमिका सुद्धा काय असेल त्यावरही भाष्य केले आहे. त्यात ते म्हणाले, की ”मी सरकारच्या बाहेर राहून काम करणार आहे. हे सरकार नीट काम करेल याची जबाबदारी माझीही असेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ”या सरकारला यशस्वी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विकासपर्व सुरु केले आहे ते आम्ही राबवू. मागील अडीज वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला जो ब्रेक लागला होता. तो निघेल आणि पुन्हा विकासाची एक्स्प्रेस धावू लागेल. असंही देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis)म्हणाले.

 

आणखी वाचा – उद्यापासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन, शासन-प्रशासन गतिमान करण्याचा निर्धार

आता महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. आणि आता ते कसं काम करणार आहेत आणि जनताभिमुख कामं कशाप्रकारे होणार आहेत ते पाहण्यासाठी जनता सुद्धा उत्सुक आहे.