उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार; अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही केली दरवाढ

Amul fresh milk price increased by rs 2 liter

देशातील सर्वात मोठी दूध डेअरी अमूलने दुधाच्या दरात मोठी वाढ केली आहे. बुधवारपासून अमूलचे दूध 2 रुपयांनी महागणार आहे. तर मदर डेअरीनेही दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवले आहे. दूधाची ही दरवाढ 6 मार्चपासून लागू होणार आहे. यापूर्वी 6 मार्च रोजी मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली होती.

दूधाची दरवाढ बुधवारपासून लागू

गुजरातसह संपूर्ण भारतात 17 ऑगस्टपासून अमूलचे दूध महाग होणार आहे. गुजरात को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने दुधाच्या दरात वाढ केली आहे. आता 500 मिली अमूल गोल्डची किंमत 31 रुपयांपर्यंत वाढणार आहे. यामुळे ग्राहकांना आता अमुल ताजाच्या 500 मिली पॅकेजसाठी 25 रुपये आणि अमूल शक्तीच्या 500 मिली पॅकेजसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत.

मदर डेअरीचे दूध कितीला मिळते?

मदर डेअरीची फुल क्रीम दूध सध्या 59 रुपये लिटरला मिळणार आहे. मात्र उद्यापासून यासाठी ग्राहकांना 2 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे, ज्यामुळे हे दूधांना आता 61 रुपयांना मिळणार आहे. त्यासोबत एक टोन्ड दूधासाठी 51 रुपये आणि गायीच्या दुधासाठी 53 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी देखील अमूल कंपनीने 1 मार्च 2022 रोजी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ केली होती, त्यावेळी कंपनीने इंधनासोबत वाहतुकीचा वाढता खर्च असे कारण दिले होते.

अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, पश्चिम बंगालच्या बाजारपेठांमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे GCMMF ने म्हटले आहे. वाढलेली ही किंमत 17 ऑगस्ट 2022 पासून सर्वत्र लागू होईल. 2 रुपये प्रति लिटर वाढ एमआरपीमध्ये 4 टक्के अनुवादित करते. हे सरासरी महागाई दरापेक्षा कमी आहे. यात कंपनीने किंमत वाढविण्यामागे असे कारण सांगितले की, अमूलच्या दुधाच्या किंमती ऑपरेशन आणि उत्पादनातील वाढीव खर्चामुळे वाढविण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत केवळ पशुखाद्याचा खर्च सुमारे २० टक्के वाढला आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्यावर भार येणार आहे.


केंद्र सरकारला मोठा दिलासा, जुलैमध्ये घाऊक महागाईत मोठी घट