घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलष्कराच्या नावाला डाग लावणारे कृत्य; दोन अधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

लष्कराच्या नावाला डाग लावणारे कृत्य; दोन अधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

Subscribe

नाशिक : नाशिक शहरातील नेहरू नगर परिसरातील लष्कराचे हवाई प्रशिक्षणा अंतर्गत हेलीकॅप्टर प्रशिक्षणाचे केंद्र असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी रिलेशन स्कूल अर्थात कॅट (कॅट) येथे कार्यरत असलेल्या मेजर हिमांशू मिश्रा आणि कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांना ठेकेदारकडून एक लाख वीस हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने ही कारवाई केली आहे. कॅटमधील दोन अधिकार्‍यांनी कामाच्या मोहबदल्यात लाच मागितल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सीबीआयने शुक्रवारी (दी.१४) सापळा रचून दोन्ही अधिकार्‍यांना रंगेहात अटक केली.

शिस्त, आदर्श, प्रामाणिकपणा आदी गुणांमुळे जनमानसात लष्कराच्याप्रती आदराची भावना आहे. परंतु लष्कराच्या या प्रतिमेला डाग लावण्याचे कृत्य नाशिकमधील कॉम्बॅक्ट आर्मी रिलेशन स्कूल (कॅट) मध्ये कार्यरत असलेल्या मेजर हिमांशू मिश्रा आणि कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांनी केले आहे. अतिशय शिस्तबद्ध कार्यशैली साठी अतिशय कठोर म्हणून परिचित असलेल्या लष्करात अशी घटना समोर आल्याने आता याची लष्करातही उच्चस्तरीय दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकार्‍यांवर शिस्तभंगची कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, लाच प्रकरणी अटक केलेले मेजर हिमांशू मिश्रा आणि कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांना शुक्रवारी (दी.१४) न्यायालया समोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २० तारखेपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयात आरोपींच्या वकिलाने अंतर्गत वादातून आरोपींना फसवण्यात आल्याचा दावा केला गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -