Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "नवाब मलिकांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला"; वानखेडेंवरून अजित पवारांची टीका

“नवाब मलिकांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला”; वानखेडेंवरून अजित पवारांची टीका

Subscribe

समीर वानखेडे यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. ज्यावेळी वानखेडे यांच्याबाबतची माहिती नवाब मलिक यांनी दिली होती, त्यावेळी त्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला गेला, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

एनसीबीचे माजी झोन डायरेक्टक समीर वानखेडे यांनी शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला कार्डिलिया क्रूझ प्रकरणात निर्दोष सोडण्यासाठी खंडणीची मागणी केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आता सीबीआयकडून समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात येत आहे. परंतु, सीबीआयकडून जे आरोप आता समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आले आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आधीच माहिती दिली होती. या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. ज्यावेळी वानखेडे यांच्याबाबतची माहिती नवाब मलिक यांनी दिली होती, त्यावेळी त्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला गेला, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आज (ता. 23 मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी गोष्टींवर आपले मत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडे प्रकरणावरून टीकास्त्र डागले आहे. (“An attempt was made to discredit Nawab Malik”; Criticism of Ajit Pawar over Wankhede)

हेही वाचा – लोकसभेच्या जागांबाबत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या मतांबद्दल अजित पवार म्हणतात…

- Advertisement -

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळी आर्यन खान याचे प्रकरण घडले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टपणे भूमिका मांडण्याचे काम केले. मिडीयाने देखील त्यांची भूमिका दाखवली. पण त्यावेळी नवाब मलिक यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न किंवा ते जाणीवपूर्वक आरोप करत असल्याचा प्रयत्न केला गेला. पण ज्यांची चौकशी आज सीबीआयकडून करण्यात येतेयं, ते अधिकारी फार स्वच्छ आहेत. त्यांची क्लीन इमेज आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे म्हणत अजित पवार यांनी निशाणा साधला.

पण आता मात्र लोकांच्या समोर त्या गोष्टी आल्याने कोणीही त्याबाबत बोलण्याचे काम नाही. कारण स्वतः सीबीआय तपास करत असल्याने आणि त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. असेही यावेळी अजिति पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अजित पवार यांनी 2 हजार रुपयांच्या नोटबंदीवरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 2 हजार रुपयांच्या नोटांमुळे भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी काहीही फायदा झालेला नाही. जर का नोटबंदी करायची होती तर मागील वेळेसारखी थेट नोटबंदीची घोषणा का केली नाही. पण नोट बदलण्यासाठी जास्त वेळ दिलेला असल्याने नागरिकांची मागील वेळे सारखी हाल होणार नाही. तर गरिबांकडे 2 हजारांच्या नोटा येणार तरी कुठून? तर नोटाबंदीच्या या निर्णयानंतर हवालाच्या मार्फत साडेचार हजार कोटी देशाबाहेर गेले असल्याचे धक्कादायक माहिती अजित पवार यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

- Advertisment -