Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नागपूर ताडोबा जंगल सफारीसाठी गेलेल्या मुंबईतील पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ताडोबा जंगल सफारीसाठी गेलेल्या मुंबईतील पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

मुंबई | महाराष्ट्र दिनाचा आनंद लुटण्यासाठी चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba-Andhari Tiger Reserve) सफारीसाठी मुंबईतील (Mumbai) एक कुटुंब गेले होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारीदरम्यान मुंबईच्या (Mumbai) एका पर्यटकाचा हृदयविकाराचा (Heart Attack) झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव केशव रामचंद्र बालगी (वय, ७१) असे आहे.

 

- Advertisement -

केशव बालगी हे मुंबईतील काळा आंबा परिसरातील रहिवासी होते. केशव बालकी त्यांच्या कुटुंबियांसोबत सोमवारी ताडोबाच्या सफारीसाठी गेले होते. परंतु, या सफारीदरम्यान केशव बालगी यांचा हृदयविकाराचा झटका आला. यानंतर पर्यटन मार्गदर्शन व वाहन चालक यांनी केशव बालगींन तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ येथे नेहण्यात होते. यावेळी डॉक्टरांनी केशव बालगी यांना मृत घोषित केले.

हेही वाचा – गुवाहाटीतील झाडे, डोंगर पाहणाऱ्या शहाजीबापूंना करायची आहे ताडोबा सफारी

- Advertisement -

ताडोबा प्रशासनाकडून केशव बालगी यांच्या कुटुंबियांना धीर देत सांत्वन करण्यात आल्याची माहिती कोलाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)  पीएल चव्हाण यांनी दिली.

 

 

 

- Advertisment -