घरमहाराष्ट्रराज्याचा कारभार प्रथमच महिलेच्या हातात जाणार? मुख्य सचिव पदासाठी 'या' नावाची होतेय चर्चा

राज्याचा कारभार प्रथमच महिलेच्या हातात जाणार? मुख्य सचिव पदासाठी ‘या’ नावाची होतेय चर्चा

Subscribe

1987 च्या बॅचमधील मनोज सौनिक आणि सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी निवड होऊ शकते. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत.

राज्य प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक IAS जोडपे राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी शर्यतीत आहे. 1987 च्या बॅचमधील मनोज सौनिक आणि सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी निवड होऊ शकते. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक मुख्य सचिव पदाच्या पहिल्या क्रमांकाच्या सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे आता राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची निवड होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (An IAS couple is in the race for the post of Chief Secretary of the state. Manoj Saunik and Sujata Saunik of 1987 batch may be selected )

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचा 30 एप्रिल रोजी कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक या सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्याचबरोबर वित्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक हेही दावेदार आहे. प्रशासकीय सेवेत सुजाता सौनिक व पती मनोज सौनिक हे पती-पत्नी राज्याची सेवा बजावत आहेत. मनोज सौनिकही अतिशय हुशार अधिकारी आहेत. या पदासाठी आणखी एक प्रबळ दावेदार आहेत ते म्हणजे नितीन करीर.

( हेही वाचा: पद्मश्री शितल महाजन यांचा विक्रम; स्काय डायव्हिंग करत 5 हजार उंचीवरुन उडी )

- Advertisement -

सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यास, प्रतिष्ठित पदावर विराजमान होणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरतील. यापूर्वी 2009 च्या सुमारास अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना चंद्रा अय्यंगार यांना या पदाला मुकावे लागले होते.

सुजाता सौनिक या हरियाणाच्या तर पती मनोज सौनिक हे बिहारचे आहेत. मनोज सौनिक हे नाशिक आणि धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.

मनोज सौनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही आवडते असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर  दुसरीकडे, सरकारने राज्याला पहिली महिला मुख्य सचिव देण्याचा निर्णय घेतल्यास, सुजाता सौनिक त्यांच्या पतीची जागा घेऊ शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -