म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Second and third phase of document verification for MHADA recruitment announced

मुंबई – म्हाडा प्राधिकरणाने (MHADA) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेत (Deposit) कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आलाय. मात्र, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम वाढवण्यात येणार आहे. मात्र ही वाढ किती असेल हे अद्यापही सांगण्यात आलेले नाही. परंतु, घराच्या एकूण रकमेच्या एक टक्का किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असण्याची शक्यता आहे. (Deposit for MHADA)

हेही वाचा – म्हाडा सोडत प्रक्रियेत होणार मोठे बदल, अर्ज भरतानाच जमा करावी लागणार कागदपत्रे

सर्वसामान्यांना परवडतील म्हणून म्हाडाकडून घरांसाठी सोडत पद्धत जाहीर केली जाते. या सोडतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. गृहस्वप्न पाहणारे सर्वजण सध्या मुंबई म्हाडा लॉटरी २०२२ची वाट पाहत आहेत. म्हाडाची सोडत जाहीर झाल्यानंतर लागलीच अर्ज भरण्यासाठी गर्दी होते. अर्ज भरताना अर्जदारांना अनामत रक्कम (Deposit) भरावी लागते. या अनामत रक्कमेबाबत म्हाडाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनामत रक्कम (Deposit) वाढवण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र, अल्प आणि अत्यल्प गटाला यातून वगळण्यात आलं असून केवळ मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम (Deposit) वाढवण्यात येणार आहे.

मुंबई ठाण्याच्या सोडतीसाठी अत्यल्प गटासाठी ५ हजार, अल्प गटासाठी १० हजार, मध्यम गटासाठी १५ हजार, उच्च गटासाठी २० हजार रुपये अशी अनामत रक्कम घेतली जाते.

हेही वाचा – म्हाडाच्या कासवगतीमुळे सर्वसामान्यांच्या घराची परवड!