राज्यात २४ तासांत २ हजार ५९१ कोरोना रूग्णांची वाढ, मृत्यूच्या संख्येत घट

coronavirus cases in india mumbai reports 852 new covid cases seven fatalities maharashtra

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ५९१ कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर राज्यात आज २ हजार ८९४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात ७८लाख ३७ हजार ६७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,०४,०२४ झाली आहे. राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२३,८२,४४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,०४,०२४ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्या १८ हजार ३६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यात राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईमध्ये ३ हजार ७५३, ठाण्यात २ हजार २५९,तर पुण्यात ६ हजार ४७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, राज्यात आज २ हजार ५९१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

देशात मागील २४ तासांत १८ हजार २५७ इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर काल शनिवारी दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात १४ हजार ५५३ इतक्या कोरोना रूग्णांनी संसर्गावर मात केली. तसेच देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत १९८ हून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा ; श्रीलंकेत आर्थिक संकट, मदतीसाठी ‘या’ देशांनी घेतला पुढाकार