घरताज्या घडामोडीजेजे रूग्णालयात स्वतंत्र कँसर विभाग सुरु होणार

जेजे रूग्णालयात स्वतंत्र कँसर विभाग सुरु होणार

Subscribe

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आश्वासन दिलं आहे. जे.जे. रूग्णालयाला दिडशे वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून कँसर विभाग सुरू करण्यात येणार आहे.

मुंबईतील सर जे.जे. समूह रुग्णालयाला दिडशे वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जे.जे. रूग्णालयात कँसर रुग्णांवर उपचारांसाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात येण्यार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. त्यासाठी आरोग्य विभागाकडून लवकरात लवकर धोरण आखण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पीपल्स् रिपब्लिकन पार्टीचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी जे.जे. रूग्णालयाबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी मुंबईत टाटा रुग्णालयावर कँसर रुग्णांचा भार येत असल्याची माहिती दिली. यावेळी आमदार विक्रम काळे यांनी जे.जे. रूग्णालयात कँसर विभाग सुरू करण्याची मागणी केली. सरकार या सुचनेबाबत सकारात्मक असून जे.जे. रूग्णालयाला दिडशे वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून कँसर विभाग सुरू करण्यात येईल. त्यासाठी विभागाकडून लवकरच धोरण आखण्याचे आश्वासन मंत्री देशमुख यांनी दिले.

- Advertisement -

हेही वाचा – करोना व्हायरस : नाशिकमध्ये सापडला करोनाचा संशयित रुग्ण

मागच्या सहा महिन्यांपासून जे. जे रूग्णालयातील ह्रदय शस्त्रक्रिया विभाग बंद आहे, असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना देशमुख यांनी सविस्तर आकडेवारी प्रस्तुत केली. डिसेंबर महिन्यात ४५१, जानेवारी ४६१ आणि फेब्रुवारी महिन्यात ४४२ ह्रदय शस्त्रक्रिया झाल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच सरकारने केमिस्टची देयके न दिल्याने त्यांनीही औषध पुरवठा थांबविल्याचा मुद्दा कवाडे यांनी उपस्थित केला. यावर, मागील सरकारने नियमात बदल केल्याने तांत्रिक कारणांमुळे काही काळ केमिस्टची देयके रखडली होती. तसेच औषध पुरवठ्या अभावी कोणतीही शस्त्रक्रिया रखडली नसल्याचे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -