दिव्यात अंडरग्राऊंड विद्युत केबल आणि ट्रान्सफॉर्मरला आग, एकजण झोपेतच होरपळला

fire in diva

ठाणे – शीळफाटा, शीळ- दिवा या ठिकाणी हनुमान हॉटेलसमोर अंडरग्राउंड टोरंट पॉवरच्या विद्युत केबलला आणि ट्रान्सफॉर्मरला शुक्रवारी सकाळी सहा वाजून २० मिनिटांच्या सुमारास आग लागली. याचदरम्यान ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्याच्या बाजूला असलेल्या आर. के. टायर या दुकानांमध्ये झोपी गेलेल्या एका ३५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच त्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डायघर पोलीस, टोरंट पॉवर विद्युत, आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. तातडीने लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत विझविण्याचे काम सुरू आहे. तर ०३- फायर वाहन, ३ वॉटर टँकर व ०१- रेस्क्यू वाहन असे पाचारण केले आहे.

तसेच मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे मुंब्रा- कौसा येथील श्रीलंका या ठिकाणी तळ अधिक पाच मजली रेहान बाग या बिल्डिंगच्या तळ मजल्यावरील होलसेलच्या दुकानाला शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत विझविण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ही ०२- फायर वाहन ०१- रेस्क्यू वाहन पाचारण केले आहे. या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

fire in diva

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात