घरठाणेशिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुन्हा दिघे; आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंची नियुक्ती

शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुन्हा दिघे; आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंची नियुक्ती

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

बंडाळीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाण्यात दिघेंची शिवसेना पाहायला मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Anand Dighe relative Kedar Dighe gets Thane District Chief Position in Shiv Sena Uddhav Thackeray)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज जाहीर केल्या आहेत. त्यानुसार अनिता बिर्जे यांना शिवसेना उपनेते पद मिळाले. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना ओवळा, माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी हे त्यांचे कार्यक्षेत्र असेल असे स्पष्ट करण्यात आले. तसेच, प्रदीप शिंदे यांना ठाणे शहरप्रमुख पद तर चिंतामणी कारखानीस यांना ठाण्याचे विभागीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीमध्ये होत असलेली धुसफूस धुडकावत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर ४० आमदारांच्या साथीने भाजपासोबत सरकार स्थापन केले. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

ठाण्यातही आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले खासदार राजन विचारे हे सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातील 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, शिंदे यांच्यासोबत न जाणाऱ्या एकमेव नगरसेविका या राजन विचारे यांच्या पत्नी आहेत.


हेही वाचा – ईडीला कुठलीही कागदपत्रे मिळालेली नाहीत, संजय राऊत यांच्या बंधूंकडून खुलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -